जाहला सूर्यास्त राणी! खोल पाणी जातसे
दूरचा तो रानपक्षी ऐल आता येत से II
मेघ रेंगाळून गेला क्षितीज रेघी किरमिजी
वाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी
काच सा काळोख भोती त्यातुनी गावातल्या
थेंब जैश्या दीप पंक्ती हालती काळ्या निळ्या II१II
पारवा शेला तुझा स्पंदने का त्या वरी?
दूर दृष्टी लागली का, का तनु ही बावरी?
धून पर्णी निर्झराची लागली आता भरू
नेत्र का ओथंबले गं हात यी हाती धरू II२II
काव्य – ‘आरती प्रभू’ (चिं.त्र्य. खानोलकर)

0 comments:
Post a Comment